esakal | सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास राज्यात बंदी!
sakal

बोलून बातमी शोधा

smoking_8.jpg

राज्याच्या आरोग्य विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास राज्यात बंदी!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राज्याच्या आरोग्य विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी दुकानांवर किंवा टपरीवर सुटी सिगारेट विकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस आणि महानगरपालिकेला देण्यात आले आहेत. 

यापुढे बिडी किंवा सिगारेट सुट्या स्वरुपात घेता येणार नाही, मात्र संपूर्ण पाकिट किंवा बिडीचे बंडल विकत घेता येईल. कॉलेजमधील तरुण-तरुणी सहजपणे सिगारेट ओढताना दिसून येतात. तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने आदेश काढला आहे. तसेच कडक अंमलबजावणीचेही आदेश दिले आहेत.  

चीनमध्ये मुस्लिमांवर अत्याचार; 16 हजार इस्लामिक मशिदी पाडल्या

सिगारेट बंदीचा निर्णय याआधीही अनेक सरकारांनी घेतला आहे. आरोग्य विभागाने सुट्टी सिगारेट व बिडीची विक्री होऊ नये यासाठी विधी व कायदा विभागासह सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे.  तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी अनेकदा बैठका झाल्या आहेत.
 
शाळा- महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र, त्यांची कठोर अंमलबजावणी न झाल्याचं दिसून येतं. 'सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३' अंतर्गत  सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतेवेळी पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश छापणे बंधनकारक आहे. मात्र, जेव्हा दुकानदार किंवा टपरीवाला सुट्टा स्वरुपात बिडी किंवा सिगारेट विकतो, तेव्हा ग्राहकाला याच्या धोक्याची जाणीव होत नाही. 

loading image
go to top