जेल प्रशासन अर्णब गोस्वामींची पूर्ण काळजी घेत आहे; राज्यपालांच्या फोननंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण

तुषार सोनवणे
Monday, 9 November 2020

रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून चर्चा केली होती. त्यावर गृहमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

मुंबई - रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून चर्चा केली होती. राज्यपाल य़ांनी गोस्वामींना दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. त्यावर गृहमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच वेतन आणि दिवाळी बोनस मिळणार

गृहमंत्री अनिल देशमुख म्हटले की,  अर्णब गोस्वामी यांची योग्य काळजी घेतली जात आहे. ते तुरंग प्रशासनाची परवानगी घेऊन कुटूंबाशी बोलू शकतात. परंतु व्हिडिओ कॉल वेगैरे करणे चूक आहे. राहिला मुद्दा कुटूंबियांना भेटण्याचा तर, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच  तुरुंगामध्ये असलेल्या व्यक्तींना कुटूंबाना भेटने राज्य सरकारने थांबवले आहे. त्यामुळे हे सर्व आपल्याच संरक्षण आणि काळजी पोटी असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. पत्रकारांच्या अधिक प्रश्नांवर बोलताना, हे प्रकरण न्यायाधिन असल्यामुळे जास्त बोलता येणार नाही असेही देशमुख यांनी म्हटले.

अर्णब गोस्वामी यांची सुटका व्हावी यासाठी राम कदम यांची तळोजा तुरुंगाला भेट

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यात विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली. तसंच शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकारणही पेटताना दिसलं. अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अशातच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. या फोनवर राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत गृहमंत्र्यांकडे चिंता व्यक्त केली होती.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state gov is taking full care of Arnab Goswami Anil Deshmukhs explanation after the governors phone call