Mhada: गिरणी कामगारांना दिलासा! 'म्हाडा'च्या घरांचे सेवाशुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Mill Workers Mhada House: पनवेल तालुक्यातील घरे मिळालेल्या गिरणी कामगारांच्या घरकुलांवरील सेवाशुल्क माफ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
MHADA

MHADA

ESakal

Updated on

मुंबई : पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथे घरे मिळालेल्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. येथील संबंधित गिरणी कामगारांच्या घरकुलांवरील १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीतील एकूण ११ कोटी ९५ लाख ६२ हजार ३६० इतके सेवाशुल्क माफ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आर्थिक चणचण असलेल्या कामगारांना आणि त्यांच्या वारसांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com