
Professor Recruitment
ESakal
मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांत वर्षभरापासून रखडलेल्या प्राध्यापक (अध्यापक) भरतीला राज्य सरकारने साेमवारी (ता. ६) मान्यता दिली. यासाठी राज्यपाल तथा कुलपती कार्यालयाने घालून दिलेल्या भरतीच्या गुणांकनासाठीचा फार्म्युला स्वीकारण्यात आला असून, त्यात शैक्षणिक अध्यापन, संशोधन गुणवत्तेसाठी (एटीआर) ७५ टक्के गुण, तर मुलाखत आणि इतर कामगिरीसाठी २५ गुण असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.