
Women Safety : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार उदासिन
मुंबई : सार्वजनिक वाहन प्रवासादरम्यान महिलांच्या विनयभंग, छेड काढण्यांच्या घटना टाळण्यासाठी केंद्रिय मंत्रालयाने प्रवासी वाहनांमध्ये पॅनिक बटन लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे नविन वाहनांमध्ये पॅनिक बटन लावण्यातही आल्या आहे.
मात्र, या बटन फक्त शोभेच्या वस्तु ठरल्या आहे. गेल्या वर्षभरात प्रवासादरम्यान अनेक महिलांसोबत विनयभंग आणि छेडकाढण्याच्या गंभीर घटना घडल्या असतांनाही अद्याप राज्य परिवहन विभागाने पॅनिक बटन कंट्रोल रूम उभारले नसल्याचे दिसून येत आहे.
खासगी किंवा शासकीय सार्वजनिक प्रवासाच्या दरम्यान महिलांना असुरक्षित वाटल्यास, सहप्रवासी किंवा गाडीच्या चालकाकडून गैरकृत्याची शंका असल्याची तातडीची मदत मागण्याची सोय पॅनिक बटण च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
बटण दाबल्यानंतर संबंधित कंट्रोल रूमला त्याची माहिती मिळेल. शिवाय घटनास्थळावरून जवळच्या पोलीस ठाण्यात सुद्धा माहिती देण्यात सोईचे ठरेल त्यासाठी व्हीटीएसद्वारे वाहनाचे लोकेशनची माहिती सुद्धा घेता येणार आहे. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरून कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याने प्रवासादरम्यान महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
पॅनिक बटन कंट्रोल रूम उभारण्याचा निर्णय शासन स्तरावरील असून, कंट्रोल रुम उभारण्याची निविदा येत्या काही महिन्यात काढण्यात येणार आहे.
- विवेक भिमनवार, आयुक्त,परिवहन विभाग