राज्य सरकारने वीजबिलाबाबत 'दिल्ली पॅटर्न' राबवावा; कोणी केली ही मागणी वाचा

प्रमोद जाधव
Saturday, 15 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारने लादलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे सरकारने दिल्ली पॅटर्न राबवून राज्यात जनतेचे विज बील माफ करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने अॅड. अजय उपाध्ये यांनी केली आहे.

 

अलिबाग ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारने लादलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे सरकारने दिल्ली पॅटर्न राबवून राज्यात जनतेचे विज बील माफ करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने अॅड. अजय उपाध्ये यांनी केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी लाक्षणिक उपोषण पुकारले.

स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीकर अंधारात! गोग्रासवाडी, नामदेवपथ परिसरातील वीजपुरवठा पंधरा तास खंडीत

कोरोनावर मात करण्यासाठी मार्च ते ऑगस्टच्या दरम्यान केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषित केले. या लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेवर लादलेला लॉकडाऊन हुकुमशहा तसेच चुकीच्या पध्दतीने लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विज बील भरण्याबाबतदेखील नागरिक असमर्थ आहेत. दिल्ली सरकारप्रमाणे, महाराष्ट्र राज्यात दरमहा विज बील 200 युनिट पर्यंत पुर्णतः माफ करण्यात यावे. याची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून राज्यात सुरु करण्यात यावी. सरकारने  महाराष्ट्रातील जनतेला पुर्णतः वीज बिल माफ करावा. केलेली विज बिलाची आकारणी रद्द करावी. या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने अॅड. अजय उपाध्ये यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. या उपोषणात पाठींबा देण्यासाठी दिलीप जोग आदी उपस्थित होते.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government should implement the Delhi pattern on electricity; Demand of Aam Aadmi Party