राज्य शासनाने केले ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार, करारांमुळे सुमारे २४ हजार रोजगार निर्माण होणार

राज्य शासनाने केले ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार, करारांमुळे सुमारे २४ हजार रोजगार निर्माण होणार

मुंबई : कोविड परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत करण्यासाठी उद्योगांनी महाराष्ट्राची निवड केली असून आज काही प्रमुख उद्योगसमुहांनी सामंजस्य करार केला आहे. या करारांमुळे सुमारे २४ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात  एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला  मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. 

उद्योगमंत्री  सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव श्री संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, एफडीआय शेरपा  प्रधान सचिव श्री भूषण गगराणी,  उद्योग प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार  उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर  विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.सुमारे 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे. कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आहे.

आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना  परिस्थितीतून नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात क्रमांक एकवर कायम राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रसायनप्रक्रीया, अत्याधुनिक डेटा यासह लाॅजिस्टिक, उत्पादन अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.  ज्याला उद्योजगांचे प्राधान्य आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणालेत. 

UK, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणूकीसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. 

सुभाष देसाई पुढे म्हणाले, डेटा सेंटर, लाॅजिस्टिक पार्क, मॅनिफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष सहज साध्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचा औद्योगिक दर्जा उंचावणार- राज्य मंत्री अदिती तटकरे

आज झालेले सामंजस्य करार म्हणजे आमची धोरणे, कौशल्य, पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणांची आमची वचनबद्धता आणि या सगळ्यापलीकडे जागतिक स्तरावरील व्यावसायिकांशी असलेले आमचे संबंध यांचे चांगले फळ आहे. भविष्यातही महाराष्ट्र राज्यात अनेक नवीन गुंतवणूकदारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळेल असा विश्वास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आभारप्रदर्शनादरम्यान व्यक्त केला.

state government signed MOUs worth 34850 crore which will create more than twenty four thousand jobs 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com