परमबीर सिंग महाराष्ट्रात दाखल; सरकार करणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Param Bir Singh
सुमारे सात तासांच्या चौकशीनंतर सिंग कक्ष 11 मधून बाहेर पडले आहेत. |Param Bir Singh #Param Bir Singh #AnilDeshmukh #Mumbaipolice

परमबीर सिंग महाराष्ट्रात दाखल; सरकार करणार कारवाई

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) आज अखेर मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान, सुट्टीवरून परतल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृह विभागाला कळवायला हवे होते. मात्र, त्यांनी अजूनही त्यांनी आपण रजेवरून परतलो असल्याचे कळविलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी राज्य सरकार सिंग यांच्यावर कारवाई करणार असल्याचे ट्विट एएनआय वृत्तस्थंस्थेने दिले आहे.

हेही वाचा: कोर्टाने विचारले तुम्ही कुठे आहात? परमबीर सिंग म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिंग आज कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या कक्ष 11 मध्ये दाखल झाले. सुमारे सात तासांच्या चौकशीनंतर सिंग कक्ष 11 मधून बाहेर पडले आहेत. याप्रकरणी तपासात सहाकार्य करणार असल्याचे सिंग यांच्या वकीलांनी सांगितले.

loading image
go to top