वाईन विक्री धोरणासाठी राज्याने मागितल्या हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wine

वाईन विक्री धोरणासाठी राज्याने मागितल्या हरकती

मुंबई : राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जात असलेल्या वाइनचा खप वाढावा म्हणून राज्य सरकारने वाईन धोरणाची घोषणा केली होती. विरोधकांनी या धोरणाच्या विरोधात सडकून टीका करण्यात आली, मात्र राज्य सरकारने या धोरणाच्या संदर्भात 31 मार्च रोजी अधिसूचना जारी केली असून, वाईन धोरणात आता सर्वसामान्यांची मत घेतली जाणार आहे. सुपर मार्केटमध्ये मांडणी किंवा शेल्फदार सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री परवाना देऊन वाइनची विक्री करण्यासाठी सर्वसामान्यांना 29 जून पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाला आपले मत कळवता येणार आहे.

वाईन धोरणाच्या विरोधात विरोधकांनी महाविकास आघाडीवर टोकाची टीका केली होती. मात्र यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे मत आता निर्णायक ठरणार आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी 29 जून पर्यंत हरकती किंवा सूचना पाठविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी केले आहे.

या हरकती किंवा सूचना 29 जून अखेरपर्यंत किंवा त्यापूर्वी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, विभागाला टपालाद्वारे अथवा dycomminspection@mah.gov.in या ई-मेल वर नोंदविण्यात येणार आहे. राज्य सरकार ने वाईन धोरणाची अधिसूचनाचा मसूदा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संकेतस्थळवर सुद्धा टाकला असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.

Web Title: State Objections Wine Sales Policy General Public Register Vote Till June

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..