esakal | निधीसाठी ठाकरे सरकारची रोजचीच बोंब, देवेंद्र फडणवीस यांची टीका

बोलून बातमी शोधा

निधीसाठी ठाकरे सरकारची रोजचीच बोंब, देवेंद्र फडणवीस यांची टीका

केंद्राकडून निधी,फंड मिळत नसल्याच्या तक्रारी करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारची ही रोजचीच बोंब असल्याची शेलकी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

निधीसाठी ठाकरे सरकारची रोजचीच बोंब, देवेंद्र फडणवीस यांची टीका
sakal_logo
By
राजेश मोरे

मुंबईः केंद्राकडून निधी,फंड मिळत नसल्याच्या तक्रारी करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारची ही रोजचीच बोंब असल्याची शेलकी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केली. ठाण्यातील भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या सहस्त्रचंडी नवकुण्डीय महायज्ञाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

दरम्यान मोफत लसीकरणाबाबत बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्राने देखील केंद्र सरकारची मदत घ्यावी, जेणेकरुन गरीब आणि मध्यमवर्गाला ही लस मोफत मिळेल. अशी सूचनाही राज्य सरकारला फडणवीस यांनी केली.

यंदा कोरोनाचे संकट बघता आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे देखील कौतुक करून 2021 वर्ष कोरोनाचा शेवट ठरो अशी प्रार्थना करत कोरोना भूतकाळात जावो असे साकडे देवीला घातले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना काळात काम करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या ठाण्यातील नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, पोलिस, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा पुरस्कार देण्यात आला. समाजात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान झालाच पाहिजे असे देखील यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका

कोपरीतील बारा बंगला जवळील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एजल्स पॅराडाईस या कमानीचे उदघाटन यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी परिसराचे प्रवेशद्वार म्हणून ही अटल कमान ओळखली जाणार आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

State Opposition Leader Devendra Fadnavis criticizes Thackeray government