राज्यात नव्या सुधारणांसह मोटार वाहन कायदा लागू होणार; परिवहन विभागाची माहिती

राज्यात नव्या सुधारणांसह मोटार वाहन कायदा लागू होणार; परिवहन विभागाची माहिती

मुंबई  : केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने 2019 मध्ये मोटार वाहन कायद्यात नव्या तरतुदी लागू केल्या. दंडामध्ये पाच ते दहापट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र हा नवा कायदा अद्याप राज्यात लागू करण्यात आला नाही. या कायद्यात सुधारणा आणि अंमलबजावणीचे अधिकार राज्यांना दिल्याने राज्यपातळीवर त्यावर चर्चा झाली. त्यानुसार लवकरच हा कायदा नव्या सुधारणांसह राज्यात लागू होणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. 

केंद्र सरकारने ओव्हरस्पीड, सीटबेल्ट, हेल्मेट, वाहतूक नियमांची पायामल्ली, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी वाहतुकीसह अनेक वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये दंड वाढवण्यात आला. त्यामध्ये पाच ते दहापट रकमेची वाढ केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये परवाना रद्द करण्यात येणार असल्याची तरतूद केली आहे. हा निर्णय गेल्या निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आल्याने अनेक राज्यांनी सुधारित दंडवाढीचा विरोध केला होता, तर महाराष्ट्र सरकारनेही त्यावर अद्याप निर्णय घेतला नव्हता; मात्र आता राज्य सरकार सुधारित मोटार वाहन कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. 

गेल्या वर्षभरात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही अपघात आणि अपघातातील मृत्यू कमी न झाल्याने परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी चिंता व्यक्त केली. नागरिकांनी स्वयंशिस्तीने नियम पाळणे आवश्‍यक आहे. सध्या नागरिकांना वाहतूक नियमांचा भंग केल्यावर असलेला दंड सहजतेने भरता येतो. त्यामुळे नियम मोडल्यावरही नागरिकांना त्यातून सुटण्याची चिंता नसते. त्यामुळे दंड वाढल्यास त्या भीतीने तरी नागरिकांना स्वयंशिस्त लागेल. त्यासाठी लवकरच नव्या सुधारणांसह दंडवाढीचा मोटार वाहन कायदा राज्यातसुद्धा लागू होण्याची शक्‍यता परिवहन आयुक्तांनी व्यक्त केली आहे. 
---------- 
              गुन्हा -                  आताचे दंड -               नवीन दंड 

  1. रस्ते वाहतूक नियमभंग - 100                      500 
  2. विनातिकीट प्रवास -       200                      500 
  3. विनालायसन्स चारचाकी वापरणे - 1000        5000 
  4. विनालायसन्स दुचाकी चालवणे - 500            5000 
  5. कालबाह्य लायसन्स -                500           10000 
  6. ओव्हरस्पीड वाहन - 400, दुचाकी 1000, चारचाकी 2000 
  7. सीटबेल्ट -                            100             1000 
  8. हेल्मेट -                           100                 1000
    आणि तीन महिन्यासाठी लायसन्स रद्द 
  9. दुचाकी ओव्हरलोडिंग -      100                  2000
    आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द. 

-----------------------------------------------------

The state will implement the Motor Vehicle Act with new amendments Department of Transportation Information

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com