डेंग्यू परसरवणाऱ्या डासांवर आता येणार रामबाण उपाय

अमोल कविटकर
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

  • डासांची सुद्धा नसबंदी होऊ शकते, ही गोष्ट तशी नवीनच आहे.  मात्र हे तंत्रज्ञान गेल्या 60 वर्षांत अनेक देशांत वापरलं जातंय. 

रोगराई पसरवणाऱ्या डासांचं काय करायचं? हा प्रश्न अनेक वर्ष सुटलेला नाही. कित्येक उपाय करुन सुद्धा डेंग्यूसारख्या रोगांचा विळखा सुटत नाही. अशात आता एक रामबाण उपाय समोर आलाय. हा उपाऊ आहे डासांच्या नसबंदीचा. 

 

  • ना उरणार डास, ना उरेल डेंग्यू!
  • डासांची नसबंदी, तीही बिनटाक्याची
  • डेंग्यू परसरवणाऱ्या डासांवर रामबाण उपाय

 

जानेवारीपासून आतापर्यंत एकट्या दक्षिण आशियात डेंग्यूचे 92 हजार रुग्ण आढळलेत. भारतीय उपखंडात विशेष करुन बांगलादेशात डेंग्यूचा प्रादूर्भाव मोठा आहे. अनेक उपयायोजना, जनजागृती करुनही डेंग्यू काही आटोक्यात येताना दिसत नाहीए.  मात्र अशात आता या डासांवर रामबाण उपाय समोर आलाय. तो म्हणजे, डेंग्यूच्या डासांच्या नसबंदीचा. 

डासांची सुद्धा नसबंदी होऊ शकते, ही गोष्ट तशी नवीनच आहे.  मात्र हे तंत्रज्ञान गेल्या 60 वर्षांत अनेक देशांत वापरलं जातंय. 

एडिस इजिप्टाय या डासावर हा नसबंदीचा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग झाल्यास डेंग्यूसह चिकनगुन्या आणि झिका या आजारांना आळा बसू शकतोय. WHO ने विचारात घेतलेल्या या प्रयोगाला प्रत्यक्ष राबवलं तर जगातील अर्ध्याहून अधिक देश डेंग्यूच्या संकटातून मुक्त होतील. त्यामुळे  ना डास राहलीत ना.. डेंग्यू.

डेंग्यू बद्दल माहिती  : 

मानवातील संसर्ग हा विषाणू बाधित एडिस एजिप्‍टाय डास चावल्‍यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार मानव – डास – मानव असा असतो. या डासांची उत्‍पत्‍ती घरातील  आणि परिसरातील भांडी, टाक्‍या आणि टाकाऊ वस्‍तू यात साठविलेल्‍या स्‍वच्‍छ पाण्‍यात होते.

विषाणू बाधित डासाने चावा घेतल्‍यानंतर लक्षणे 5 ते 6 दिवसांच्‍या अधिशयन काळात दिसून येतात. मात्र हा काळ ३ ते १० दिवसांपर्यतचा असू शकतो. रोगांची सर्वसाधारण चिन्‍हे आणि लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी आणि डोळयांच्‍यामागे दुखणे ही डेंग्यू ची लक्षणं आहेत.  

Webtitle : Sterilization of mosquito to avoid dengue and zika

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sterilization of mosquitoes to avoid dengue and zika