esakal | स्ट्रॉबेरी, द्राक्षे @ 200 | बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने फळांचे भाव कडाडले
sakal

बोलून बातमी शोधा

स्ट्रॉबेरी, द्राक्षे @ 200 | बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने फळांचे भाव कडाडले

मार्गशिर्ष महिन्यात फळांना बाजारपेठेत फळांना चांगली मागणी असते. परंतु यंदा या मागणीचा परिणाम म्हणून अनेक फळांचे भाव वाढले आहेत. 

स्ट्रॉबेरी, द्राक्षे @ 200 | बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने फळांचे भाव कडाडले

sakal_logo
By
अजित शेडगे

माणगाव  : मार्गशिर्ष महिन्यात फळांना बाजारपेठेत फळांना चांगली मागणी असते. परंतु यंदा या मागणीचा परिणाम म्हणून अनेक फळांचे भाव वाढले आहेत. स्ट्रॉबेरी आणि द्राक्षेत तर खूप महाग झाली आहेत. गेल्या वर्षी याच काळात ही दोन्ही फळे 100 रुपये किलो या भावात विकण्यात येत होती. आता त्यांचा भाव तब्बल 200 रुपये झाला आहे. 

यंदा हिवाळ्याच्या हंगामात केळी, सफरचंद, चिकू या फळांची आवक चांगली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडतील अशा भावात बाजारपेठेत उपलब्ध आहेत. केळी 40 रुपये डझन, चिकू 50 रुपये किलो, पपई 50 रुपये किलो, संत्री 50 आणि सफरचंद 120 ते 160 रुपये किलो या भावात विकण्यात येत आहेत. दिवाळीपूर्वी ही फळे काहीशी महाग होती. आता भाव स्थिर आहेत. दुसरीकडे आकर्षण असणारी द्राक्षे आणि स्ट्रॉबेरीचे भाव यावर्षी जानेवारी महिन्यात चढेच आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने भाव वाढलेले आहेत. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

फळ गेल्या वर्षीचा भाव आताचे भाव 
1) द्राक्षे 100 200 
2) स्ट्रॉबेरी 100 200 

गेल्या काही महिन्यांत फळांची आवक चांगली आहे. त्यामुळे भाव स्थिर आहेत. स्ट्रॉबेरी, द्राक्षे आवक कमी आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी ही फळे महाग आहेत. येत्या काही दिवसात आवक वाढेल व भाव उतरतील. 
- उमेद बागवान,
फळ विक्रेता, माणगाव 

Strawberries, Grapes 200 rs Fruit prices soared due to declining inflows in the markets

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image