BIG NEWS - 10 दिवस वाढलं लॉकडाऊन, नवी मुंबईत शुक्रवारपासून 13 जुलैपर्यंत टोटल लॉकडाऊन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता नवी मुंबईत सुरू असणारा लॉकडाऊन आणखीन दहा दिवसांनी वाढवण्यात आला आहे.

नवी मुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता नवी मुंबईत सुरू असणारा लॉकडाऊन आणखीन दहा दिवसांनी वाढवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी टाळेबंदी दहा दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी 3 जुलै पासून 13 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन सर्व हॉटस्पॉटमध्ये सुरू राहणार आहे.

नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा थांबण्याचा नाव घेत नाही. आजही शहरात 218 कोरोनाबाधित नावे रुग्ण आढळून आले तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 जून पासून 5 जुलै पर्यंत सात दिवसांचा लॉकडाऊन घेण्याचे आदेश महापालिका आणि पोलिसांना दिले होते.

BIG NEWS - पनवेलकरांनो १० दिवसांचं सामान भरून ठेवा, कडकडीत लॉकडाऊन झालाय घोषित; 'या' आहेत तारखा...

शहरातील कोरोनाबधितांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या 10 कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता हा लॉकडाऊन आता आणखीन दहा दिवस वाढवण्यात येणार असल्याचे परिपत्रक महापालिकेकडून काढण्यात आले आहे.

शहरातील हॉटस्पॉटमध्ये दहा दिवसांची टाळेबंदी कठोरपणे राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेश मिसाळ यांनी दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु हा लॉकडाऊन एपीएमसी मार्केट आणि एमआयडीसी भागाला लागू नसणार आहे. मात्र त्यांनी सोशल डिस्टन्सचे नियम पळून व्यवसाय करायचे आहे असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

strict lockdown in navi mumbai for ten days starting from 3rd to 13th july


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: strict lockdown in navi mumbai for ten days starting from 3rd to 13th july