esakal | Fake TRP | रिपब्लिक विरोधात सबळ पुरावे हाती; मुंबई पोलिसांचे कठोर कारवाईचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Fake TRP | रिपब्लिक विरोधात सबळ पुरावे हाती; मुंबई पोलिसांचे कठोर कारवाईचे संकेत

बनावट टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्हीविरोधात महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागल्याचा दावा पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. त्यामुळे येत्या काळात "रिपब्लिक'विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत. 

Fake TRP | रिपब्लिक विरोधात सबळ पुरावे हाती; मुंबई पोलिसांचे कठोर कारवाईचे संकेत

sakal_logo
By
सुनिता महामुणकर


मुंबई  : बनावट टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्हीविरोधात महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागल्याचा दावा पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. त्यामुळे येत्या काळात "रिपब्लिक'विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत. 
बनावट टीआरपी प्रकरणी पोलिसांनी "रिपब्लिक'सह अन्य वाहिन्यांविरोधात फौजदारी फिर्याद नोंदविली आहे. यामध्ये काही जणांना अटक केली असून आरोपपत्रही दाखल केले आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी आणि रिपब्लिकच्या सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका "एआरजी आऊटलिअर'च्यावतीने करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी न्यायालयात हमी दिली होती की रिपब्लिकच्या कर्मचाऱ्यांविरोधात सहा जानेवारीपर्यंत कठोर कारवाई करणार नाही. त्यानुसार आज न्या.एस.एस. शिंदे आणि न्या.एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. "रिपब्लिक'विरोधात अनेक महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे संरक्षण देता येणार नाही, असे मुंबई पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाला सांगितले. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी नुकतेच "बार्क'चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना अटक केली. दासगुप्ता यांनी विशिष्ट वाहिन्यांना गैरप्रकारे टीआरपी दिल्याचा शेरा मारून दंडाधिकारी न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजूर केल्याची माहिती सिब्बल यांनी न्यायालयाला दिली. जून 2013 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत दासगुप्ता कार्यरत होते. पुढील सुनावणीला तपास अहवाल दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. "एआरजी'चे वकील आज उपस्थित नसल्याने तूर्तास ही कारवाई 15 जानेवारीपर्यंत करणार नाही, असेही पोलिसांकडून त्यांनी सांगितले. 

Strong evidence against the Republic tv Indications of strict action by Mumbai Police

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image