एसटी कोरोनाच्या फटक्यातून सावरेना; रोज केवळ दिड कोटींचे उत्पन्न

एसटी कोरोनाच्या फटक्यातून सावरेना; रोज केवळ दिड कोटींचे उत्पन्न


मुंबई :  निव्वळ प्रवासी उत्पन्नातून रोज जवळपास 22 लाख रूपये मिळवणारी एसटीची राज्यभरातील सेवा अजूनही सुरळीत झाली नाही. 20 ऑस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. मात्र, ऐरवी रोज 66 लाख प्रवाशांना सेवा देणारी एसटी सध्या फक्त 3.8 लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. त्यामूळे एसटीला रोज 21 कोटींचा फटका बसत आहे.     

महामंडळाच्या 31 विभागांमध्ये एकूण 18 हजार 500 बस एसटीच्या ताफ्यात आहे. कोरोनापुर्वी एसटीचे रोजचे 22 कोटींचे उत्पन्न होते. मात्र, मार्च महिन्यात लाॅकडाऊनमुळे  मुंबई उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील एसटीची सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली होती. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाल्याने, मार्च महिन्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन सुद्धा देता आले नाही. तर, एसटीचे अनेक प्रकल्प ठप्प पडले. त्यामूळे कोरोना काळातील 153 दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये सुमारे 3366 कोटींचे एसटीचे नुकसान झाले असल्याने भविष्यातही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. 

खिळखिळी एसटी आता नादुरूस्त 
आधीच एसटीच्या ताफ्यातील बस खिळखिळ्या आणि गळक्या आहे. त्यातच आता, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद असल्याने प्रंचड खिळखिळी असलेल्या बस नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन रस्त्यांवरच एसटीचे ब्रेकडाऊन होत असल्याने, पावसातच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. 

संचित तोटाही वाढला
- -

वर्ष संचित तोटा वार्षिक तोटा  
2014-15 1685 कोटी 392 कोटी  
2015-16 1807 कोटी 121 कोटी   
2016-17 2330 कोटी 522 कोटी   
2017-18 3663 कोटी 1578 कोटी   
2018-19 4549 कोटी 886 कोटी   
2019-20 5353 कोटी 803 कोटी  
2020-21 6155 कोटी  802 कोटी  


एसटीची वाहतुक (20 ते 29 आॅगस्ट)

विभाग चालवलेल्या बस फेऱ्या प्रवाशी संख्या 
औरंगाबाद 932 3922 110152
मुंबई 677 3648 94838
नागपूर 400 1290 32545 
पुणे 805 3247 67939 
नाशिक - 516 1633 36183
अमरावती 453 1893 44988
एकूण 3783 15633 38645

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com