सीईटी सेलमध्ये होणार विद्यार्थ्यांचे समुपदेशन; विद्यार्थी पालकांच्या शंका दूर होणार

सीईटी सेलमध्ये होणार विद्यार्थ्यांचे समुपदेशन; विद्यार्थी पालकांच्या शंका दूर होणार

मुंबई : व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सीईटी सेलने विभागीय स्तरावर सीईटीच्या मुख्य कार्यालयात अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यामुळे प्रवेश घेताना विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल्या शंका व अडचणी दूर होणार आहेत.

यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला उशिरा प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सेलने हेल्पलाईनची व्यवस्था केली आहे. त्यानूसार विद्यार्थ्यांना हेल्पलाइनच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांना दरवर्षी अर्धवट माहितीमुळे तसेच प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरताना चुकीच्या समुपदेशानामुळे प्रवेशात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून महाविद्यालयांच्या प्रतिनिधींशी सीईटी सेल आता थेट संपर्क साधून मार्गदर्शन करत आहे. सीईटी सेलच्या दोन्ही मजल्यावर प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय अधिकारी उपलब्ध केले आहेत. या माध्यमातून तांत्रिक तसेच अभ्यासक्रमाच्या अडचणी सोडविण्यात येत आहेत. प्रवेशप्रक्रिया सुरळीत व्हावी आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कृषी, कला, वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकारी या केंद्रात मार्गदर्शनासाठी उपलब्ध केले आहेत. यासाठी अधिकार्‍यांच्या विशेष आयटी तसेच मार्गदर्शन तज्ज्ञांचीही नियुक्ती केली आहे. 

अभियांत्रिकी, औधनिर्माणशास्त्र, एमबीए, एममएस, एमसीए, हॉटेल मॅनेजमेेन्ट, अर्किटेक्चर या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी परीक्षा समन्वयक व विशेष कार्यकारी अधिकारी प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी काम करणार आहेत. प्रवेश प्रक्रिया, संस्था व महाविद्यालयांची परिपूर्ण माहिती, अभ्यासक्रम कसे असणार, शैक्षणिक शुल्क, आरक्षण कोटा, प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावे आदी माहिती विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

Student counseling to be held in CET cell The doubts of the student parents will be removed

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com