esakal | मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी विद्यार्थी मंत्रालयावर धडकणार; मराठा ठोक मोर्चांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी विद्यार्थी मंत्रालयावर धडकणार; मराठा ठोक मोर्चांचा इशारा

गुरूवारी विद्यार्थ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकनार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी विद्यार्थी मंत्रालयावर धडकणार; मराठा ठोक मोर्चांचा इशारा

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - मराठा आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना, राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आरक्षणाविना घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. गुरूवारी विद्यार्थ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - मध्य, पश्चिम रेल्वेच्या टर्मिनस स्थानकावर कोविड चाचणीस सुरूवात

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे राज्यातील शैक्षणिक प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे आरक्षणाविनाच म्हणजेच एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना खुला प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहे. 

हेही वाचा - नवी मुंबईकरांच्या सेवेत दोन मोबाईल टॉयलेट बसेस; पालिकेची कौतुकास्पद कामगिरी

सरकारच्या निर्णयाविरोधात मराठा ठोक क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या सरकारवरील आमचा विश्वास उडाला असून आता न्यायासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल. मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थी मंत्रालयावर उद्या (गुरूवारी) मोर्चा काढणार असल्याचा इशारा क्रांती मोर्चाने दिला आहे.

Students at mantralay to ask for answers regarding Maratha reservation said Maratha Thok Morcha 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top