शालेय मुले सर्वाधिक तणावग्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

मुंबई : बदलती शिक्षणव्यवस्था आणि स्पर्धांमुळे शालेय मुलांचे आयुष्यही तणावग्रस्त झाले आहे. मुंबईतील 10 ते 18 वयोगटातील मुलांना शालेय व शिक्षणकेंद्री ताणाचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन अभ्यास, परीक्षा, शैक्षणिक शिकवण्या (ट्युशन), पालकांच्या अपेक्षा यांचा विद्यार्थ्यांवर अधिक ताण असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. मुंबईनंतर बेंगळूरु, चेन्नई व नवी दिल्लीमधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे प्रमाण अधिक आहे.

शालेय विद्यार्थ्यांमधील तणावाबाबत स्कूलड्युड डॉट कॉम संस्थेतर्फे देशातील प्रमुख शहरांमध्ये नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून मुंबईतील शालेय विद्यार्थी सर्वाधिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. मुंबई, बेंगळूरु, चेन्नई, नवी दिल्ली, पुणे अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद या आठ महत्त्वाच्या शहरांमध्ये याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये शाळा आणि शैक्षणिक पद्धतीचा विद्यार्थ्यांवर किती परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. सर्वेक्षणामध्ये 10 ते 18 वयोगटातील पाच हजार बालकांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील दोन हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी 80 टक्के म्हणजेच एक हजार 600 विद्यार्थ्यांना शालेय व शिक्षणकेंद्री ताणाचा सामना करावा लागत असल्याचे असल्याचे निदर्शनास आले. 

स्कूलड्युड डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना दैनंदिन अभ्यास, परीक्षा, शैक्षणिक शिकवणी, पालकांच्या अपेक्षांचा ताण सर्वाधिक असल्याचे आढळून आले. मुंबईखालोखाल बेंगळूरुमधील 65, चेन्नईतील 50; तर नवी दिल्लीतील 40 टक्के विद्यार्थ्यांमध्ये गंभीर तणावाचे प्रमाण आढळून आले, अशी माहिती स्कूलड्युड डॉट कॉमचे संस्थापक रामचंद्रन कन्नन यांनी दिली. 

तणावग्रस्त मुलांचा वयोगट : 10 ते 18. 
सर्वेक्षण केलेली आठ शहरे : मुंबई, बेंगळूर, चेन्नई, नवी दिल्ली, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद. 

र्वाधिक गंभीर तणावग्रस्त मुले असलेली शहरे (प्रमाण टक्केवारीत) : 
मुंबई- 80 
बेंगळूरु- 65 
चेन्नई- 50 
नवी दिल्ली- 40 
सर्वेक्षण केलेल्या मुलांची एकूण संख्या : 5,000. 
सर्वेक्षण केलेल्या मुंबईतील मुलांची संख्या : 2,000. 
मुंबईतील शिक्षणकेंद्री तणावग्रस्त मुलांची संख्या : 1,600. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students of the school are most stressed Survey of the School Dudom Institute