
भविष्यातील वाहने आता खऱ्या अर्थाने प्रदुषण मुक्त होणार आहे.सौर उर्जेवर वाहाने चार्ज करण्याचा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपीनेने केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे
मुंबई : भविष्यातील वाहने आता खऱ्या अर्थाने प्रदुषण मुक्त होणार आहे. सौर उर्जेवर वाहने चार्ज करण्याचा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपीनेने केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे.आता हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
बंगलूरू येथील एका पेट्रोल पंपवर सौर उर्जवर इलेक्ट्रीक वाहान चार्ज करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.हायजी एजर्नी या कंपनीने हि सिस्टीम तयार केली असून त्यासाठी टेक महिंद्रा या कंपनीचेही सहकार्य मिळाले आहे.
वाहानांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.त्यापुढे जाऊन वाहनांच्या चार्जिंगसाठी वापरली जाणारी विज ही पुर्णपणे प्रदुषण मुक्त असेल यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे.इंडियन ऑईलच्या पहिल्या प्रयोगाला यश आले आहे.आता या प्रयोगाची व्याप्ती वाढविता येणार आहे."इंडियन ऑईल कंपनी पर्यायी इंधनाच्या वापरला प्रोत्साहन देत आहे.त्यासाठी 54 ठिकाणी वाहनाच्या बॅटरी चार्जिग आणि बॅटरी बदलण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.बंगलूरु मध्ये सौर उर्जेवर वाहानांची बॅटरी चार्च करुन खऱ्या अर्थाने प्रदुषण मुक्त वाहनाची संकल्पना प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्षात उतरली आहे.
एक्स्प्रेस हायवेवरील एसटी बस अपघात चालकाच्या चुकीमुळेच! पोलिस तपासाअंती सत्य समोर
हाच प्रयोग आता इतर इंधन पंपवरही करण्यात येणार आहे.असे इंडियन ऑईल चे रिटेल,सेल्सचे कार्यकारी संचालक विग्यान कुमार यांनी सांगितले.वाहानांच्या ऍल्युमिनीअम एअर बॅटरी बनविण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने इस्त्राईलच्या फिनर्जी या कंपनीसोबत प्रयत्न सुरु केले आहेत.
---------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )