esakal | प्रशासनाचा दरारा संपतो तेव्हा अशा घटना घडतात : जितेंद्र आव्हाड
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

प्रशासनाचा दरारा संपतो तेव्हा अशा घटना घडतात : जितेंद्र आव्हाड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : प्रशासनाचा (Goverment) दरारा ज्या दिवशी संपतो, त्या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर (officers) हल्ले होण्याच्या घटना घडतात, अशी टिप्पणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली.

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान फेरीवाल्याकडून हल्ला करण्यात आलेल्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आव्हाड बुधवारी रात्री ज्युपिटर रुग्णालयात आले होते, वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

या आव्हाड म्हणाले, की ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावरील हल्ला दुर्दैवी त्या पिंपळे यांचे बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून बचावल्या. स्वतः चालत नाहीत, त्यामुळे घरातून उतरल्यावर थेट फेरीवाल्याकडे जातात आणि खरेदी करतात आणि पुन्हा घरी परततात.

हेही वाचा: "साहेब... रात्री ड्युटीवरून घरी परतणाऱ्या महिलांची सुरक्षा पुन्हा धोक्यात आहे" जेलरोडची घटना

त्यांनी अलीकडे ही सवय लावून घेतली आहे. त्यामुळे अशा घटनांसाठी केवळ पालिकेला जबाबदार धरता येणार नाही. यात समाजाचीही तितकीच जबाबदारी आहे .

loading image
go to top