esakal | शिवसेनेला थंड करण्यासाठी भाजपनं उगारलं शेवटचं अस्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला थंड करण्यासाठी भाजपनं उगारलं शेवटचं अस्त्र

ठराविक कालावधीत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल असं सूचक विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. 

शिवसेनेला थंड करण्यासाठी भाजपनं उगारलं शेवटचं अस्त्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरूंय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री सेनेचाच होईल असं सांगून भाजपच्या जखमेवर मीठ चोळलंय. त्यामुळे आता सेनेला थंड करण्यासाठी भाजपनं शेवटचं अस्त्र काढलंय. हे अस्त्र आहे राष्ट्रपती राजवटीचं.

सनी लिओनीवर चोरीचा आरोप; काय चोरलं 'सनी'ने ?

ठराविक कालावधीत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल असं सूचक विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना आणखीनच संतापलीय. राष्ट्रपती राजवटीच्या भूमिकेवर शिवसेनेनंही आक्रमक होत भाजपला प्रत्युत्तर दिलंय. 

मोबाईलवरून फोटो अपलोड करा आणि शेतीची नुकसान भरपाई मिळवा

राज्यात भाजप-सेनेनं एकत्र निवडणूक लढवली. मात्र सत्तास्थापनेत दोघांनाही मोठा वाटा हवाय. अशात हा वाद वेळीच मिटला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राज्यपालांच्या हाती राज्याची सूत्र असणं म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपच्या हाती सत्ता असण्यासारखंच आहे.

असं झालं तर यात शिवसेनेचंच नुकसान होईल. त्यामुळेच भाजपनं हे सर्वोच्च अस्त्र बाहेर काढलंय. अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. 

WebTitle : sudhir mungantiwar to shivsena and presidential rule in maharashtra