निरोगी समजणारेच प्री-डायबेटिकने ग्रस्त, मुंबईकरांमध्ये जागरुकता नाही

निरोगी समजणारेच प्री-डायबेटिकने ग्रस्त, मुंबईकरांमध्ये जागरुकता नाही

मुंबईः  भारतातील विविध वयोगटानुसार केलेया अभ्यासातून असे आढळून आले आहे की निरोगी समजणारेच मधुमेही किंवा प्री-डायबेटिकने ग्रस्त आहेत. मेकिंग इंडिया हार्टस्ट्रॉन्गचा सर्व्हे यांनी संपूर्ण भारतभर केलेया सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

'मेकिंग इंडिया हार्टस्ट्रॉन्ग सर्व्हे' हे सर्वेक्षण दोन भागांत विभागण्यात आले आहे. लोकांचा हृदयाच्या आरोग्यविषयीचा दृष्टीकोन आणि प्रत्यक्षात हृदयरोगाचा धोका असलेल्या लोकांची वास्तविक संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी यामध्ये प्रश्नावलीवर आधारित मुलाखती आणि एचबीए1सी (सरासरी शर्करा स्तर) आणि लिपिड प्रोफाइल टेस्ट्स यांचा समावेश करण्यात आला. भारतीयांच्या दैनंदिन जेवणाच्या सवयी आणि रोज खाल्ले जाणारे पदार्थ यामुळे भारतीयांचे आरोग्य निश्चित करताना एचडीएल आणि ट्रिग्लायसेराईड्स यासारखे काही निकष देखील गणले गेले. महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतील 6 शहरांमधील 600 व्यक्तींच्या प्रतिक्रिया यामध्ये नोंदवण्यात आल्या आणि हृदय, रक्तवाहिन्यांच्या आजारांसंबंधी भारतीयांची जागरूकता आणि भारतीयांचे काम/जीवनशैली आणि सवयी यातील परस्परसंबंध यांचे विश्लेषण करण्यात आले.

'आपण निरोगी आहोत' अशी समजूत असणाऱ्यांपैकी 38% भारतीय मधुमेही आहेत असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. तर 28% निरोगी व्यक्ती त्यांच्या एचबीए1 सी लेव्हल्सनुसार प्री-डायबेटिक असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे, सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी दोन तृतीयांश व्यक्तींना एकतर हृदय आणि रक्तवाहिन्यांचा आजार आहे किंवा त्याचा धोका आहे.

सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, मधुमेह आणि अति जाडेपणा हे हृदयरोगांना कारणीभूत ठरणारे आजार आहेत. याची 50% भारतीयांना कल्पनाच नाही. तब्बल 88% लोकांना हे माहिती नाही की कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर हृदयरोग होऊ शकतो.

14 टक्के मुंबईकरांमध्ये जागरुकता नाही

मुंबईमध्ये मधुमेह आणि हृदयरोग यांच्या दरम्यान असलेल्या संबंधाबाबत मुंबईकरांच्या जागरूकतेचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे फक्त 14% आहे. याउलट हैद्राबादमध्ये आणि विजयवाड्यामध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 45% आणि 43% आहे. या सर्वेक्षणातून आढळून आले आहे की, शुद्ध रक्तवाहिन्या टणक होणे हा एक हृदयरोग आहे ही बाब फक्त 10% भारतीयांनाच माहिती आहे.

केईएम रुग्णालयातील कंन्सल्टन्ट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि असोसिएट प्रोफेसर (युनिट हेड) डॉ. चरण लांजेवार यांनी सांगितले, "शुद्ध रक्तवाहिन्या टणक होण्याच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. खासकरून युवा पिढीची बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यामुळे त्यांच्या बाबतीत हा आजार बळावत आहे. संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, शुद्ध रक्तवाहिन्या टणक होण्याशी संबंधित कोरोनरी स्टेनोसिसमुळे जवळपास 30% लोक आजारी आहेत. 

मधुमेही व्यक्तींना हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार (सीएडी) होण्याचा धोका दोन ते चार पट जास्त असतो. मधुमेह नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत मधुमेही व्यक्तींच्या बाबतीत हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार दोन ते तीन दशके आधी होऊ शकतो.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Suffering from diabetes pre diabetic considered healthy 14 percentage  Mumbaikars do not have awareness

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com