घरातले झोपेत असताना तो बाथरूममध्ये गेला आणि...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

घरातील सर्वजण उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठाणे : फेसबुकवर पोस्ट टाकून राहत्या घरात गळफास लावून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.20) ठाण्यात घडली. मंदार भोईर असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये त्याने आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा - बोगस काॅल सेंटर, व्हायग्रा आणि अमेरिकन नागरीक

सोमवारी पहाटे कुटुंबीय झोपेत असताना घरातील बाथरूममध्ये जाऊन त्याने गळफास लावला. घरातील सर्वजण उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मंदार याने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट प्रसारित केली होती.

वाचा काय आहे सेक्सप्रूफ मेक-अप

त्यात त्याने मी आयुष्याला कंटाळून जीव देत आहे. माझे काही चुकले असेल तर माफ करा. तसेच आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्याने यात म्हटले आहे. मंदार हा महापालिकेत नोकरीस होता, मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो नोकरीवर जात नसल्याची माहितीही त्याच्या मित्र परिवाराने दिली. 

web title : Suicide of a young man by posting a post on Facebook


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a young man by posting a post on Facebook

Tags
टॉपिकस
Topic Tags: