सुकेशनं मला फसवलं, 'ईडी'च्या रडारवर असलेल्या जॅकलीनचा दावा | Jacqueline Fernandez | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकेशनं मला फसवलं, 'ईडी'च्या रडारवर असलेल्या जॅकलीनचा दावा

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या वसुली प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची नावं समोर आली होती

सुकेशनं मला फसवलं, 'ईडी'च्या रडारवर असलेल्या जॅकलीनचा दावा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 200 कोटींच्या वसुली प्रकरणात (Two Hundred Crore collection case) बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरनं (Sukesh chandrasekhar) तिला फसवल्याचा दावा केला आहे, सुकेशनं खोटं नाव सांगून आपल्याशी ओळख करुन घेतली असं तिनं ईडीच्या अधिकाऱ्यांना (Enforcement directorate) सांगितलं आहे. तसंच आपल्याशी संपर्क करण्यासाठी सुकेशनं आपल्या मेकअप आर्टीस्टचा वापर केला अशीही माहिती तिनं दिली आहे. सुकेशच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल (charge sheet) केलं आहे, त्यातून ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: मुंबई : रेशन धान्याचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; 24 जणांना अटक

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या वसुली प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची नावं समोर आली होती. सुकेशनं या दोघींना कोट्यावधी रुपयांचे गिफ्ट्स दिले होते. त्यामुळं या प्रकरणात त्यांचा काय संबंध आहे याचा तपास ईडीचे अधिकारी करत होते. ईडीनं या संदर्भात जॅकलीन फर्नांडीसचा जबाबही नोंदवला होता. त्यातूनच त्यानं खोटं नाव सांगून आपल्याशी ओळख करुन घेतल़्याचं जॅकलीननं म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे.

जॅकलीननं इडीला दिलेल्या जबाबानुसार सुकेशनं तो सन टिव्हीचा मालक असल्याचं तिला सांगितलं होतं तसंच तिला दाक्षिणात्य चित्रपटात काम देण्याचं आश्वासनही त्यानं दिलं होतं. 2021 च्या सुरुवातीला सुकेशला काही दिवस जामिन मिळाला होता, तेव्हा तो जॅकलीनला भेटला होता.

पिंकी इराणीची घेतली मदत

सुकेश चंद्रशेखरनं जॅकलीन फर्नांडीस पर्यंत पोहोचण्यासाठी सुकेशसोबतच अटक करण्यात आलेल्या पिंकी इराणीची मदत घेतल्याची माहिती इडीला मिळाली होती, ती तपासण्यासाठी इडीच्या अधिकाऱ्यांनी तिहार जेलमध्ये जाऊन पिंकी इराणी आणि सुकेश चंद्रशेखरची भेट घेतली होती. तेव्हा जॅकलीनपर्यंत पोहोचण्यासाठी पिंकीनं सुकेशकडून मोठी रक्कम घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर जॅकलीनच्या मेकअप आर्टीस्टमार्फत सुकेशनं जॅकलीनची ओळख करुन घेतली होती.

Web Title: Sukesh Chandrasekhar Two Hundred Crore Collection Case Charge Sheet Filed Jacqueline Fernandez Explanation Nora Fatehi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top