BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

मुंबई - कोरोना विरुद्धचा लढा कधी संपतोय याच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. जगभरात कोरोनाविरुद्धच्या औषधांवर आणि लसींवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. या लसींच्या संशोधतात अमेरिका, रशिया, इंग्लंड, भारत आघाडीवर आहेत. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. सन फार्मा आणि झेनारा फार्मा या दोन कंपन्यांना कोरोना रुग्णांवरील उपचार असलेल्या फॅविपिरावीर गोळ्या बनवण्यास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DGCI ने संमती दिली आहे. यापैकी सन फार्माची एक गोळी ३५ रुपयांची आहे. 

सन फार्माची गोळी 'फ्लू गार्ड' नावाने बाजारात येईल, तर झेनारा फार्माच्या गोळीचे नाव फॅवीझेन आहे. कोविड ची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार म्हणून या गोळ्या उपयुक्त आहेत. रुग्णांना सहज परवडतील अशा दरात ही गोळी बाजारात आणली असल्याचे सन फार्मास्युटिकल च्या भारतातील कारभार पाहणाऱ्या विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती गणोरकर म्हणाल्या.

या गोळ्या सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तर बायोफोर इंडिया फार्मास्युटिकलची उपकंपनी असलेल्या झेनारा फार्माला देखील फॅवीझेन गोळ्यांच्या उत्पादनाला संमती मिळाली आहे. आपल्या गोळ्या शंभर टक्के भारतीय बनावटीच्या असून आखाती देशांत तसेच दक्षिण अमेरिकेतही त्या निर्यात केल्या जातील, असे व्यवस्थापकीय संचालक जगदीश रंगीशेट्टी यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

sun pharma and zenara pharma recieved nod to sell covid 19 favipiravir

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com