

Vanrang 2026
ESakal
महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्र असलेल्या नरिमन पॉइंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी तीन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक व पारंपरिक उत्सव 'वनरंग २०२६'चा अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात शुभारंभ झाला. या भव्य उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) व विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती लाभली.