Sunil Bhusare : विक्रमगड विधानसभेची फेरमतमोजणी ची मागणी; पराभुत ऊमेदवार सुनिल भुसारांनी केली लेखी मागणी
Vikramgad Assembly : विक्रमगड विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार सुनिल भुसार यांनी ईव्हीएमवरील आक्षेप घेत फेर मतमोजणीसाठी ४ लाख ७२ हजार रुपये भरले आहेत. आता १० मतपेट्यांची मतमोजणी होईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मोखाडा : नुकत्याच झालेल्या राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर आघाडी च्या पराभूत ऊमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतले आहे. महाविकास आघाडी ने राज्यभरात ईव्हीएम विरोधात राणं ऊठवले आहे.