esakal | महापालिका विरोधी पक्षनेते पदाची भाजपची पुनर्विचार याचिका फेटाळली - SC
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

महापालिका विरोधी पक्षनेते पदाची भाजपची पुनर्विचार याचिका फेटाळली - SC

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे (BMC) विरोधी पक्षनेते पद मिळावे म्हणून भाजपने केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) फेटाळली आहे. हा भाजपसाठी (BJP) धक्का आहे तर विरोधी पक्षनेते पद कॉंग्रेसकडे (Congress) राहाणार असल्याने कॉग्रेससाठी दिलासादायक निर्णय आहे. 2017 च्या निवडणुकीत (Elections) संख्याबळानुसार भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. मात्र, तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची युती असल्याने भाजपने विरोधी पक्षनेते (opposition leadership) पदावर दावा सांगितला होता. त्यामुळे हे पद कॉंग्रेसला मिळाले. (Supreme Court deny Rethinking petition of BJP on Opposition Leadership-nss91)

हेही वाचा: CORONA DEATH : शरीराच्या 'या' अवयवांवर घातक परिणाम, जाणून घ्या सविस्तर

सध्या रवी राजा हे विरोधी पक्षनेते आहे.मात्र,राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला.मात्र,महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे पद कॉंग्रेसला देण्यास नकार दिला.त्यानंतर भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.त्यावर उच्च न्यायालयाने कॉंग्रेसच्या बाजूने निर्णय दिला.यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.या निकालानंतर भाजपकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.ही याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात फेटाळली आहे.त्यामुळे आता हे पद कॉंग्रेसकडेच राहाणार आहे.

loading image