esakal | "जिनके अपने घर शिशे के होते है..."; कोर्टाने परमबीरना सुनावलं
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir-Singh-Letter

"जिनके अपने घर शिशे के होते है..."; कोर्टाने परमबीरना सुनावलं

sakal_logo
By
विराज भागवत
  • परमबीर यांच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबई: माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात असलेल्या सर्व आरोपांची चौकशी महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणेकडून केली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. या याचिकेवर सुनवाई करण्यास कोर्टाने नकार दिला. सध्या परमबीर सिंह यांच्या विरोधातील आरोपांची चौकशी महाराष्ट्र पोलिसांमार्फत केली जात आहे. पण तसे न करता या सर्व प्रकरणांची चौकशी राज्याबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणेकडे द्यावी, अशी मागणी सिंह यांनी केली होती. ज्यांची स्वत:ची घरं काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडं मारू नयेत, असं स्पष्ट निरिक्षण कोर्टाने नोंदवलं.

"परमबीर सिंह, तुमची मागणी खूपच आश्चर्यकारक आहे. तुम्ही स्वत: ३० वर्षांपेक्षाही अधिका काळ राज्यातील पोलिस दलातील सेवेत आहात. आता तुम्ही म्हणत असाल की तुमचा राज्यातील पोलीस दलाच्या तपास पद्धतीवर आणि यंत्रणेवर विश्वास नाही, तर मग तुमचं वक्तव्य खूपच धक्कादायक वाटतं. जे लोक इतके वर्षे तिथेच काम करत आहेत त्यांनी त्या गोष्टीविरोधात मत व्यक्त करावं हे पटत नाही. ज्यांची स्वत:ची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगडं मारत नाहीत", अशा शब्दात कोर्टाने परमबीर सिंह यांची कानउघाडणी केली.