मुंबईच्या मुसळधार पावसात सुप्रिया सुळेंचं 'FB लाईव्ह', शरद पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबईच्या मुसळधार पावसात सुप्रिया सुळेंचं 'FB लाईव्ह', शरद पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबईः मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसााचं थैमान सुरू आहे.  त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन ठप्प झाले. त्यात मुंबईत तुंबलेलं पाणी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील आश्चर्यचकीत झाले. मुंबईत प्रचंड पाऊस कोसळल्याने मंत्रालयासमोरही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं.

शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे वाय बी चव्हाण सेंटरमधून बाहेर पडल्यावर त्यांनाही तुंबलेल्या पाण्यातून आपली गाडी नेण्याची वेळ आली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केलं. शरद पवार यांनी देखील आपण दक्षिण मुंबईत असं पाणी साचल्याचं कधीच पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. मंत्रालयासमोर आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मंत्रालयासमोरील तुंबलेलं पाणी पाहून शरद पवार अचंबित झाले. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांनो काळजी घ्या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

सुप्रिया सुळे यांनी स्वत:च्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरुन हे लाईव्ह केलं आहे. या व्हिडीओत सुप्रिया सुळे यांनी मंत्रालय परिसरातील पाणी पाहिल्यानंतर विश्वासच बसत नाही, इतक्या वर्षात इथे कधी पाणी तुंबलेले पाहिले नाही, अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनीही मी पहिल्यांदा आयुष्यात इथे या भागात पाणी तुंबलेलं पाहतो आहे, असं म्हटलं.

मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही शरद पवार यांनी त्यांची नेहमीची कामे थांबवलेली नाहीत. काल संध्याकाळी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, दुग्धविकास मंत्री हसन मुश्रीफ यासह विविध नेते उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर रात्री पवार आणि सुप्रिया सुळे हे घरी जायला निघाले. यावेळी पाऊस सुरू असल्याने सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून मुंबईतील पावसाचं लाइव्ह सुरू केलं. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून पवारांची गाडी बाहेर पडून एअर इंडियाच्या दिशेने निघाली. यावेळी मंत्रालयासमोर प्रचंड पाणी साचले होते. पूरस्थिती झाली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे या ड्रायव्हरला गाडी पाण्यातून बाहेर काढण्याबाबतच्या सूचना देत होत्या. दरम्यान मंत्रालयाचा परिसर पार केल्यानंतर पुढे पाणी कमी होतं. त्यामुळे पवार सुखरूप घरी पोहोचले.

Supriya sule facebook live Mumbai Water Logging sharad pawar shocking reaction

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com