esakal | NCB मार्फत आज दीपिकाची चौकशी, दीपिकाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

NCB मार्फत आज दीपिकाची चौकशी, दीपिकाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार ?

या प्रकरणात बॉलिवूडमधील सध्याची सर्वात नामांकित अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची आज NCB कडून चौकशी केली जाणार आहे.

NCB मार्फत आज दीपिकाची चौकशी, दीपिकाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार ?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर त्याच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येतायत. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड आणि ड्रग्सचं कनेक्शन. सुशांतला ड्रग्स दिले गेलेत का ? त्याला कोण ड्रग्स पुरवत होतं? त्याला मुद्दामून ड्रग्स दिले जात होते का ? त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला का ? या प्रश्नांचा उलगडा होईलच. मात्र सध्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकच्या चौकशीमधून आणि त्यांच्या मोबाईल चॅटवरून अनेक बडे खुलासे होतायत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणी चौकशी करतंय. रिया, शोविक आणि  त्यांच्या अन्य साथीदारांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई देखील सुरु आहे. छापेमारी देखील सुरु आहे. अशात रियाने दिलेल्या माहितीनुसार आता ड्रग्स प्रकरणी बॉलिवूडमधील अप्सरांपर्यंत हे प्रकरण येऊन पोहोचलंय. 

या प्रकरणात बॉलिवूडमधील सध्याची सर्वात नामांकित अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची आज NCB कडून चौकशी केली जाणार आहे.. सोबतच बॉलिवूड मधील इतर मोठ्या अभिनेत्रींचीही आज चौकशी केली जाणार आहे. यामध्ये सारा अली खान, आणि श्रद्धा कपूरचा समावेश आहे.

NCB आपल्या चौकशीत दीपिकाला कोणते प्रश्न विचारू शकते. 

  • तुम्ही ड्रग्ज घेता का?
  • ड्रग्ज वगळता इतर कोणता नशा करता?
  • तुम्ही ड्रग्ज अॅडिक्ट आहात का?
  • इंडस्ट्रीमधले ड्रग अॅडिक्ट कोण आहेत?
  • एखाद्या ड्रग्ज सप्लायरला ओळखता?
  • कधी एखाद्या पेडलरकडून ड्रग्ज मागवलं?
  • करिश्मा प्रकाशची चॅट केलं होतं का?
  • करिश्माकडून ड्रग्ज मागवले होते?
  • कोको बारमध्ये काय केलं ? कोको बारमध्ये ड्रग्जचं सेवन केलं का?
  • तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप त्या एडमिन आहेत का? ज्यात ड्रग्स विषयी चॅट झाले?

दरम्यान काल NCB मार्फत काल रकुल प्रीत सिंगची चौकशी करण्यात आली होती. याचसोबत दीपिकाची मॅनेजर करिश्माची चौकशी केली गेलीये. त्यानंतर आज इतर अभिनेत्रींची चौकशी केली जाणार आहे   

loading image