सुशांतसिंग मृत्यू प्रकरणः रियाचे वडील व भावाची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी

अनिश पाटील
Thursday, 27 August 2020

रियाचा भाऊ शौविकची  केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)गुरूवारी चौकशी केली. तर रियाच्या वडीलांची सक्त वसुली संचलनालय( ईडी) चौकशी केली आहे. तर एनसीबी लवकरच रियाला चौकशीसाठी समन्स पाठवु शकते.

मुंबई  -  रियाचा भाऊ शौविकची  केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)गुरूवारी चौकशी केली. तर रियाच्या वडीलांची सक्त वसुली संचलनालय( ईडी) चौकशी केली आहे. तर एनसीबी लवकरच रियाला चौकशीसाठी समन्स पाठवु शकते.
सुशांत सिंग प्रकरणी सीबीआयने शौविकसह सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, नोकर नीरज, रजत मेवाती, केशव व सुशांतच्या इमारतीचा सुरक्षा रक्षकाची चौकशी केली. सुशांतच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची याप्रकरणी प्रथम चौकशी करण्यात आली आहे.

रिया म्हणाली होती सुशांतला विमानात भिती वाटायची, अंकिता लोखंडेने सुशांतचाच तो व्हिडिओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर - 

रिया चक्रवर्तीच्या सांताक्रुझ येथील घरात गुरूवारी मुंबई पोलिस आले होते. पोलिसांनी रियाच्या वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांच्या सांगण्यावरून त्यांना ईडीच्या चौकशीसाठी नेले. सूत्रांन दिलेल्या माहितीनुसार इंद्रजीत यांना एका खासगी बँकेच्या शाखेत नेण्यात आले आहे. तेथे त्यांचे लॉकर असून सोबत येताना लॉकरच्या चाव्या आणण्यासाठी ईडीच्या अधिका-यांनी सांगितले होते.
 सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे सक्तवसूली संचलनालयाला (ईडी) मिळाल्याचा दावा संचालक राकेश अस्थाना यांनी केला होता. त्यानंतर रिया विरुद्ध  कलम 20, 22, 27, 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करने रिया चक्रवर्तीची दहशतवादी कसाबसोबत केली तुलना - 

ईडीने पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही  अस्थाना यांनी दिली आहे. यामुळे आता ईडीही त्या बाजूनेही  तपास करणार आहे. यासंदर्भातले रियाचे काही वॉट्सअॅप चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्यांना गौरव आर्य हा ड्रग्ज पुरवित होता. गौरव हा रिया आणि जय साहा यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. तसेच रिया आणि गौरव आर्यचे वॉट्सअॅपचॅट देखील समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी सीबीआय, ईडी व एनसीबी अशा तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh death case: Riyas father and brother interrogated by central authorities