सुशांतच्या बहिणींविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून सुनावणी; दिला महत्त्वाचा निकाल

सुमित बागुल
Monday, 15 February 2021

आज मुंबई उच्च न्यायालयात सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणी प्रियांका सिंह आणि मीतु सिंह यांच्याविरुद्धच्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी पार पडली

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सुशांतने खरंच आत्महत्या केली की सुशांतची हत्या झाली याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. यामध्ये एक अँगल म्हणजे सुशांतच्या बहिणीने सुशांतसाठी पाठवलेलं औषधांचे प्रिस्क्रिबशन. सुशांतच्या बहिणीने दिल्लीतील रुग्णालयामधून सुशांतसाठी एक वैद्यकीय चिठ्ठी पाठवली होती. ज्यातील औषधे घेऊन सुशांची मानसिक स्थिती अधिक बिघडली आणि सुशांतने आत्महत्या केली अशी एक थेअरी समोर येत होती. रियाने देखील सुशांतच्या बहिणीवर हेच आरोप केलेले होते. रियाने मुंबई पोलिसांकडे जो जबाब नोंदवला त्यामध्ये रियाने हाच संशय व्यक्त केलेला.  

महत्त्वाची बातमी : म्हाडाकडून बांधकाम प्रकल्पांना प्रिमियममध्ये सवलत देण्याबाबत फेरविचार

दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणी प्रियांका सिंह आणि मीतु सिंह यांच्याविरुद्धच्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मीतू सिंहविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे. मात्र याच प्रकरणात बहीण प्रियांकावरील गुन्हा कायम ठेवण्यात आला आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेता अवैध मार्गाने बंदी असलेली औषधे सुशांतला मिळण्यास मदत करण्यासाठी सुशांतच्या बहिणींवर गुन्हा दाखल केला गेलेला. आज मुंबई हायकोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी झाली.

महत्त्वाची बातमी :  धूम!  धूम! धूम! मुंबईच्या रस्त्यांवर इलेक्‍ट्रिक बाईकचा धुमाकूळ, या बाईक्समुळे मुंबईत काय होतंय वाचा

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर दिलासा न मिळालेली बहीण प्रियांका आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं समजतंय.

sushant singh rajput case mumbai HC gave relief to mitu singh but case continued on priyanka singh  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case mumbai HC gave relief to mitu singh but case continued on priyanka singh