esakal | थेट तुरुंगात जाऊन शौविक चक्रवर्तीची चौकशी करणार NCB,कोर्टाची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

थेट तुरुंगात जाऊन शौविक चक्रवर्तीची चौकशी करणार NCB,कोर्टाची परवानगी

रियासह तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा कूक दीपेश सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिघांनाही नवी मुंबईतल्या तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. शौविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंत यांची तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी एनसीबीला दिली आहे.

थेट तुरुंगात जाऊन शौविक चक्रवर्तीची चौकशी करणार NCB,कोर्टाची परवानगी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्येचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं. या चौकशीदरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीला अटक केली गेली. रियासह तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा कूक दीपेश सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिघांनाही नवी मुंबईतल्या तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. 

दरम्यान कोर्टानं गुरुवारी शौविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंत यांची तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी एनसीबीला दिली आहे.  शौविकच्या मोबाइल फोनमधून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. शौविकचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं एनसीबीनं कोर्टात दावा केला असल्याचं नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सब्स्टांसेस अॅक्ट, 1985 (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985) च्या स्पेशल कोर्टासमोर एनसीबीने सांगितलं. सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी शौविक चक्रवर्ती सध्या तुरुंगात आहे. रियाच्या आधी शौविक आणि दिपेशला अटक करण्यात आली होती. 

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या संपर्कात शौविक होता, अशी माहिती चौकशीदरम्यान उघड झाली. यामुळे शौविकची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दिपेश सावंतची देखील चौकशी करणं गरजेचं असल्याचं एनसीबीनं कोर्टात सांगितलं. एनसीबीनं केलेली ही मागणी मान्य करत कोर्टानं तळोजा तुरुंगात  जाऊन  दोघांची चौकशी करता येईल अशी परवानगी दिली आहे. 

एनसीबीला तपासाचा अधिकार नाही, रियाच्या वकिलांचा दावा

अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीच्या वतीने गुरुवारी एनसीबी करीत असलेल्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. रियाला हेतुपुरस्सर केन्द्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. यावर एनसीबीला खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सुशांतला ड्रग्सचे व्यसन होते आणि त्याच्यासाठी ड्रग घेतले होते, त्याचे कधीही सेवन केले नाही, असेही रियाच्या वतीने सांगण्यात आले. तो नेहमी त्याच्या जवळच्या व्यक्तींना ड्रगसाठी वापरायचा असेही रिया शौविकच्या वतीने सांगण्यात आले. अन्य आरोपी जवळ अत्यल्प प्रमाणात अमली पदार्थ मिळाले आहेत, मात्र ते कायदेशीर दृष्टिकोनातून गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने एनसीबीला सोमवारपर्यंत या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले. यावर पुढील सुनावणी २९ सप्टेंबरला होणार आहे. अन्य तीन आरोपींनीही जामीनासाठी अर्ज केला आहे.

Sushant Singh Rajput Case NCB interrogate Showik Chakraborty Taloja jail court allows