सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्ज कनेक्शन; एनसीबीकडून छापेमारीत नेमकं काय घडलं?

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 September 2020

एनसीबीकडे यासंदर्भात सबळ पुरावे असल्यामुळेच ही छापामारी करण्यात आली आहे. यातून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  
 

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासप्रकरणात अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) शुक्रवारी सकाळी रिया चक्रवर्तीच्या घरी छापेमारी केली. अंमलीपदार्थ कनेक्शनमध्ये शौविक चक्रवर्ती याचे नाव आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सकाळी साडेसहा वाजता एनसीबी टीम रियाच्या घरी दाखल झाली.  एनसीबीसोबत मुंबई पुलिस आणि सीबीआय टीम देखील उपस्थितीत असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या स्टाफ सदस्यांपैकी अनेक लोकांचे ड्रग्जसंदर्भातील चॅट्ससमोर आले होते. त्यानंतर मुंबई पोलिस, सीबीआयनंतर आता एनसीबी टीमही सक्रीय झाली आहे. सॅम्युअल मिरांडा याच्या घरी देखील छापेमारी झाल्याचे समोर आले आहे.  रिया आणि शौविक चक्रवती तपासात सहकार्य करत आहेत. एनसीबीकडे यासंदर्भात सबळ पुरावे असल्यामुळेच ही छापामारी करण्यात आली आहे. यातून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

एनसीबीच्या कारवाईचा घटनाक्रम 

-सकाळी जवळपास 6:40 वाजण्याच्या सुमारास रिया चक्रवर्तीच्या प्राइम रोज अपार्टमेंट आणि सॅमुअल मिरांडाच्या घरावर एनसीबीची छापेमारी
-नारकोटिक्‍स अधिकारी केपीएस मल्‍होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शौविक आणि सॅम्युअल यांना समन्स देण्यात आले. चौकशीसाठी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
-मोबाइल, लैपटॉप आणि हार्ड डिस्‍क जप्त करण्यात आलीय 
- शौविकची चौकशी ड्रग्जप्रकरणातील आरोपी जैद विलात्रा आणि अब्‍दुल बासित परिहार यांच्यासमोर चौकशी होण्याचे संकेत
-जैद 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत आहे. अब्दुल बासित परिहारला एनसीबी शुक्रवारी न्यायालयात दाखल करणार आहे. 
-एनसीबी श्रुति मोदी, रिया चक्रवर्ती आणि जया साहा यांचीही चौकशी करणार आहे. शुक्रवारी केलेली छापेमारी ही केवळ  शौविकभोवती केंद्रीत आहे. ड्रग्ज चॅटमध्ये रियाचे नाव असल्यामुळे तिच्या अडचणीही वाढल्या आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput Death case live updates ncb raids rhea chakraborty and samuel mirandas house