सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला एनसीबीकडून अटक

अनिश पाटील
Saturday, 5 September 2020

केंद्रीय अंमली पदार्थ विपोधी पथकाने(एनसीबी) सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला शनिवारी अटक केली. ही याप्रकरणातील तिसरी अटक आहे

मुंबई : सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी)ने रिया चक्रवर्तीचा शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक केल्यानंतर आता रियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, रियाच्या सांगण्यावरून सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा दावा मिरांडा व शौविकने चौकशीवेळी केला आहे. आता केंद्रीय अंमली पदार्थ विपोधी पथकाने(एनसीबी) सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला शनिवारी अटक केली. ही याप्रकरणातील तिसरी अटक आहे

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

एनसीबीने शुक्रवारी सकाळी रिया आणी सॅम्यअल मिरांडाच्या घरी छापेमारी केल्यानंतर मिरांडाला ताब्यात घेतले. तर शौविकला तत्काळ समन्स बजावित चौकशीला हजर राहण्यास सांगितले. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी रियाच्या सांगण्यावरून सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करीत असल्याचे सांगितले. तसेच ते ड्रग्ज रिया आणि दिपेश सांवतला देत होतो, त्यानंतर ते सुशांतला दिले जात असल्याची कबुली शौविक आणि सॅम्युअलने दिल्याने एनसीबी सतर्क झाले आहे. यावेळी शौविक आणि सॅम्युअल याना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या दोघांना 9 सप्टेंबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. केंद्रीय अंमली पदार्थ विपोधी पथकाने(एनसीबी) सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला शनिवारी अटक केली. ही याप्रकरणातील तिसरी अटक आहे. सुशांतसिंग राजपूत राहत असलेल्या दोन मजल्यांच्या फ्लॅटमध्ये दिपेश तळमजल्याला रहायचा. सुशांतच्या आत्महत्येवेळी दिपेश घटनास्थळी उपस्थित होता.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajputs servant Dipesh Sawant arrested by NCB