
- -2017 मध्ये रियाला भेटल्यानंतर फोनवरुनच चर्चा
- -गौरवच्या विविध भागिदारांबाबत माहिती
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः गौरव आर्याची ईडीकडून चौकशी
मुंबई - बॉलीवुड अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाला दिवसे-दिवस वेगळे वळण लागत असुन, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) समन्वयाने तपास करत आहेत. सुशांत सिंग प्रकरणी ईडीने गौरव आर्याची तर सीबीआयने रिया चक्रवर्ती, सुशांतची बहिण मितु सिंग आणि सिद्धार्थ पिठाणीची चौकशी केली. यावेळी सीबीआयच्या एक पथकाने सुशांतच्या घराचीही पाहणी केली.
पालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका
गौरव आर्या सोमवारी सकाळी 11 वाजता ईडी कर्यालयात दाखल झाला. यावेळी त्याला प्रसारमाध्यमानी घेरले असता, उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना आपला याप्रकरणाशी काही संबध नसल्याचे त्याने सांगितले. गौरवने रविवारी गोव्याहून मुंबईसाठी निघताना सांगितले होते की, तो 2017मध्ये रिया चक्रवर्तीला भेटला होता. त्यानंतर तो रियाला भेटला नाही. तसेच सुशांत सिंह राजपूतला तो केव्हाच भेटला नसल्याचेही त्याने सांगितले होते. याबाबतच ईडीने गौरवची चौकशी केली.त्याने रिया सातत्याने फोन तसेच मेसेज केल्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. गौरवच्या गोव्यातील द टमरिण्ड हॉटेलसह दुबईमध्ये भागीदारीत अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्तेत कर्नाटकच्या आमदाराची देखील भागीदारी असल्याचे समोर आले आहे. नेमकी ही भागीदारी कशाप्रकारची आहे, याबाबतही ईडीने प्रश्न विचारले. तसेच कुठे कुठे मालमत्ता आहेत ? याबाबतही गौरवला विचारण्यात आले. मात्र त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे ईडीतील सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, गौरव आर्याच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी त्याच्या भागिदारांनाही बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कासीम आझमीचे नाव पुढे येत आहे. त्याबाबत गौरवकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
रिया, मितु सिंग-सिद्धार्थ पिठाणीची सीबीआय चौकशी
रिया चक्रवर्तीची सलग चौथ्या दिवशी सीबीआयच्या पथकाने सोमवारी चौकशी केली. आतापर्यंत रियाची 25 तास चौकशी सीबीआने केली आहे. सीबीआयने सोमवारी सुशांतची बहिण मितु सिंग आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यांच्या समोर रियाची चौकशी केली. या चौकशीदरम्यान, मितुने 8जुन ते 14 जुन पर्यंतचा सर्व घटनाक्रम सांगितला. घटनाक्रमाची सिद्धार्थकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी मितुकडून करण्यात आली
------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Web Title: Sushant Singh Suicide Case Gaurav Aryas Inquiry Ed About Various Partners
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..