Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

''उद्धव ठाकरे तुम्ही, माझे वडील चोरले.. माझे वडील चोरले म्हणताएत ना मी एकच क्लिप दाखवतो.''
Sushma Andhare s answer to mns chief raj thackreay over her video politics
Sushma Andhare s answer to mns chief raj thackreay over her video politicsSakal

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे मध्ये श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचार्थ सभा घेतली यावेळी राज यांनी लाव रे तो व्हिडीओ चा पुन्हा प्रयोग केला आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना विडिओ दाखवला,

त्यामध्ये त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं वार्धक्यावरून टीप्पणी करत आहेत आता सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे ना सोशल मीडिया वर पोस्ट करत प्रतिउत्तर दिले आहे. शिंदे फडणवीस अजित पवार यांनी दिलेल्या सुपारी मध्ये पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे असा चिमटा सुषमा अंधारेंनी काढला.

काय म्हणाले होते राज ठाकरे

''उद्धव ठाकरे तुम्ही, माझे वडील चोरले.. माझे वडील चोरले म्हणताएत ना मी एकच क्लिप दाखवतो.'' असं म्हणत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ, असं म्हटलं आणि सुषमा अंधारेंचा व्हिडीओ सुरु झाला. व्हिडीओमध्ये अंधारे म्हणातएत की, ८०-८५ वर्षांच्या म्हताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग.. हात थरथरथर कापायला लागलेत... काय उपयोग.'' ही जुनी क्लिप राज ठाकरेंनी पुन्हा दाखवली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, याच बाईंना उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नेतेपद दिलंय. भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसता.. आणि बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे असं म्हणता? असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्न उपस्थित केले.

सुषमा अंधारेंचा पलटवार

मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही माञ कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात..

शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.

माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात , माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली?

27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ?

...पण असो माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना?

सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा...!

धन्यवाद..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com