
झवेरी बाजार येथे चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या आरोपीला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपीने हे दागिने पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंदिरातून चोरल्याचा संशय आहे.
मुंबई - झवेरी बाजार येथे चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या आरोपीला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपीने हे दागिने पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंदिरातून चोरल्याचा संशय आहे.
अजय महावीर भुक्तार (१९) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो हिंगोली येथील हमालवाडीतील रहिवासी आहे. झवेरी बाजार परिसरात संशयीतरित्या फिरत असताना गस्तीवर असलेल्या पथकाने धानजी स्ट्रीट येथे आरोपीला बोलावले. त्यावेळी त्याने पलायन केले असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत त्याच्याकडे दोन हार व हिरे सापडले. त्यावेळी दोन पंचाच्या मदतीने पंचनामा करून हे दागिने ताब्यात घेण्यात आले. त्याला या दागिन्यांबद्दल विचारले असता आरोपीने समाधानकारक उत्तर दिले नाही, अखेर त्याला याप्रकरणी सीआरपीसी कलम ४१ (ड) अंतर्गत ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
त्याची चौकशी केली असता आरोपीने पुण्यातील विश्राम बाग पोलिसांच्या हद्दीतील अखिल मंडई गणपती मंदिरातून चोरल्याचे सांगितले. त्यावेळी पुणे पोलिसांशी संपर्क साधला असता आरोपीने तेथून २२४ ग्रॅम वजनाचे दागिने चोरल्याचे समजले. पोलिसांना आरोपीकडे १४२ ग्रॅम दागिने सापडले आहेत. आरोपीला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
गुरुवारी मध्यरात्री आरोपीने मंदिरातील सभा मंडपाकडे जाणाऱ्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर चोरट्याने श्री शारदा गजाननाच्या मूर्तीवरील सुवर्णहार, कंठी व मंगळसूत्र चोरले होते. शुक्रवारी मंदिरातील पुजाऱ्याने नेहमीसारखे मंदिर उघडले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते.
Suspect arrested in Mumbai in Mandai Ganpati temple Jewelry theft case
------------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )