
Raigad Sea : रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट दिसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेला सतर्कतेचे आदेश आले आहेत. केंद्र शासनाच्या गुप्तचर विभागाकडून तसा संदेश सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ बंदरे, ४६ लॅंडिंग पॉर्ईंटवर पोलिस, कस्टम, तटरक्षक दलाचे विशेष लक्ष आहे. किनारी भागात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील याबाबत महत्त्वाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना बोटी तपासण्याचे आदेश दिले आहेत.