
Rare Birds Return to Tadoba-Andhari Tiger Reserve: विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता गवताळ प्रदेशात आढळणाऱ्या दुर्मीळ पक्ष्यांची संख्या वाढत आहे. या प्रकल्पातील सहा गावांचे १९ वर्षांपूर्वी स्थलांतर केल्याने त्या ठिकाणी नैसर्गिक कुरणाची निर्मिती झाल्याने हे पक्षी आकर्षित होत आहेत.