
मुंबई : ३० रुपयांसाठी टेलरचा ग्राहकावर कात्रीने हल्ला
मुंबई : वापरातील कपड्यात बदल केल्याचा मोबदला न दिल्याने एका टेलरने खासगी कंपनीतील (Private company) व्यवस्थापकावर (Manager) कात्रीने जीवघेणा हल्ला (scissor attack) केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. रोहित यादव (वय ३०) असे जखमीचे नाव आहे. अंधेरी पोलिसांनी आरोपी हरीष टाकर याच्यावर गुन्हा दाखल (FIR) केला आहे.
हेही वाचा: सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प - प्रविण दरेकर
गोरेगावच्या इंडस प्रा. लि. कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून रोहित काम करतात. गेल्या रविवारी त्यांनी स्वतःचे कपडे ओळखीतील टेलर हरिष याच्याकडे दिली. यासाठी हरिषने १०० रुपये खर्च सांगितला. रविवारी सायंकाळी रोहित हरिषच्या दुकानावर गेले. त्यावर हरीषने शंभरऐवजी १३० रुपयांची मागणी केली. त्यावरून दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर रोहित ३० रुपये न देता दुकानातून बाहेर पडले.
त्याचा राग आल्याने हरिषने त्याच्याकडील कात्री घेऊन रोहितवर मागून हल्ला केला. यात रोहितच्या पोटाजवळ कात्रीने वार केले. त्यानंतरही हरिषने रोहितच्या दंडावर आणि खांद्यावर वार केले. रोहीतने मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा हरिष पळून गेला. नंतर आजुबाजूच्या लोकांनी येवून त्याला उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
Web Title: Tailor Scissor Attack On Private Company Manager For Thirty Rupees Mumbai Crime Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..