"मराठा आंदोलनाच्या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर..."

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा
"मराठा आंदोलनाच्या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर..."

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने निर्णय घ्यावा. राज्य सरकारकडून जर वेळकाढूपणा करण्यात आला किंवा निर्णय घेण्यास मुद्दाम दिरंगाई करण्यात आली तर यंदाचे पावसाळी अधिवेशन चालू दिले जाणार नाही, असा इशारा भाजपचे राज्य उपाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी दिला. मराठा समाजाने आतापर्यंत संयमाची भूमिका घेतली. त्यामुळे याचा फायदा घेत मविआ सरकारने आता आमचा अंत पाहू नये. संघर्षाच्या या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर त्याला एकमेव आघाडी सरकार जबाबदार असेल, असे लाड यांनी बजावले. (Take Quick Decisions on Maratha Reservation or else face the consequences warns BJP Prasad Lad)

"मराठा आंदोलनाच्या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर..."
आशावर्कर्सना वेतनवाढ, कोरोनाकाळात वाढीव मोबदला देण्यास नकार

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी आज कोल्हापुरातून खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मूक आंदोलनाला सुरुवात झाली. भाजपने मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना लाड यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला. या मूक निदर्शनाचे रूपांतर पुढे संघर्ष, आंदोलन आणि नंतर हिंसेत झाले तर त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असेही लाड यांनी बजावले आहे.

"मराठा आंदोलनाच्या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर..."
'सेना भवनाकडे वाकडी नजर करु नका एवढीच अपेक्षा'

"मराठा समाजाने आतापर्यंत संयमाची भूमिका घेतली, त्यामुळे याचा फायदा घेत आघाडी सरकारने अंत पाहू नये. संघर्षाच्या या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर त्याला फक्त आघाडी सरकार जबाबदार असेल", असे लाड यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील या मूक आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. मराठा समाजाचा कार्यकर्ता आणि आमदार म्हणून माझाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. सरकारने डोळे उघडले नाहीत, तर मराठा समाज संतप्त होईल आणि याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, असेही लाड म्हणाले.

"मराठा आंदोलनाच्या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर..."
भाजप-शिवसेनेमध्ये तुफान राडा; शिवसेना भवनासमोर घडला प्रकार

तीन पक्षाच्या आघाडी सरकारने याबाबत तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा. पाच जुलैला विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मराठा आरक्षणावर काही कारवाई झालेली दिसली नाही, तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. मराठा समाजाच्या हितासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरही उतरू, असेही लाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com