esakal | खासगी बसवर कठोर कारवाई करा, कोविड 19 च्या नियमांची पायमल्ली
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बसवर कठोर कारवाई करा, कोविड 19 च्या नियमांची पायमल्ली

100 टक्के प्रवासी वाहतुकीसाठीचे नियम डावलून सर्रास अतिरिक्त भाडे घेऊन प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्याने परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहे.

खासगी बसवर कठोर कारवाई करा, कोविड 19 च्या नियमांची पायमल्ली

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: दिवाळी हंगामाच्या अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन खासगी बस वाहतूकदार परिवहन विभागाने आखून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवत आहे. 100 टक्के प्रवासी वाहतुकीसाठीचे नियम डावलून सर्रास अतिरिक्त भाडे घेऊन प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्याने परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहे.

राज्य सरकारने नुकतेच खासगी बस वाहतुकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे. त्यासाठी कोविड 19 च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना केल्या आहे. वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे,  प्रवाशांच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे याशिवाय एसटी बस भाड्याच्या फक्त दिडपट भाडेच खासगी बस वाहतूकदार घेण्याची परवानगी आहे. 

मात्र, सध्या राज्य सरकारने आखून दिलेल्या नियम अटींची पायमल्ली करून खासगी बस वाहतूकदार प्रवासी वाहतूक करत आहे. त्यामुळे मुंबई क्रॉफर्ड मार्केट, चेंबूर, बोरिवली, दादर, ठाणे, पनवेल, वाशी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, धुळे येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी खासगी बस वाहतुकदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, सोमवारपर्यंत कारवाईचा अहवाल सुद्धा परिवहन आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे.

अधिक वाचा-  बाळासाहेबांच्या स्मृतीस आमचे लाखो लाखो साष्टांग नमस्कार: सामना

परिवहन विभागाच्या अशा आहेत सूचना

 • बसचे आरक्षण चौकशी कक्ष स्वच्छता करावी
 • कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असतांना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, 
 • बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, 
 • मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बस मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, 
 • बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे
 • बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावे. 
 • बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी 
 • एखाद्या प्रवाशास ताप , सर्दी, खोकला, असल्यास प्रवास करण्यास प्रतिबंध 
 • प्रवासादरम्यान जेवण, अल्पोहार, प्रसाधनगृहासाच्या वापर याकरिता बस थांब्यावरील ठिकाणे स्वच्छ ठेवणे.
 • प्रवासाच्या आधी प्रवाशांचे तापमान चेक करावेत 
 • एसटीच्या दिडपट पेक्षा जास्त भाडे आकारू नये.

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Take strict action private buses Break rules Covid 19 Extra fare passengers