तानसा नदीच्या महापुरामुळे गरम पाण्याची कुंडे बुडाली: जनजीवन विस्कळीत

दीपक हिरे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

- ठाणे जिल्ह्यातील गरम पाण्याचे कुंड म्हणून ओळखले जाणाऱ्या
अकलोली वज्रेश्वरी गावांना मोठा तडाखा बसला आहे
-  तानसा नदीला आलेल्या महापुरामुळे येथील गरम पाण्याची कुंड बुडाली आहेत
- केलठण पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील गरम पाण्याचे कुंड म्हणून ओळखले जाणाऱ्या अकलोली वज्रेश्वरी गावांना तानसा नदीला आलेल्या महापुरामुळे मोठा तडाखा बसला आहे. येथील गरम पाण्याची कुंड बुडाली आहेत तसेच, केलठण पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.

तानसा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक घरात पाणी घुसले आहे. अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी वाढल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून येथील लोकांचे मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक तसेच घरातील इतर मौल्यवान सामानाचे नुकसान झाले आहे.

अकलोली येथील जवळ जवळ 20 ते 25 घरात पाणी शिरले होते मात्र कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नसली तरी, वाढलेल्या नदीच्या पाण्यामुळे लोकांचे अतोनात हाल झाले आहेत.
     

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tansa river floods disrupted Life of People in Vajreshwari