

MIDC Administration Starts Emergency Repair Work
Sakal
संतोष घरत
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक युक्त सांडपाणी समुद्रात सोडण्यासाठी टाकण्यात आलेल्या वाहिनीला गळती लागल्याने नवापूर गावालगतच्या परिसरात रासायनिक पाणी साचल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पिण्याच्या जलवाहिनीलगतच हे रासायनिक पाणी साचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संभाव्य आरोग्य धोक्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.