तारापूर औद्योगिक वसाहती मधील आरे कंपनीत वायू गळती; एक कामगाराचा मृत्यू

चार कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कामगाराचा मृत्यू
कामगाराचा मृत्यू sakak

मनोर : तारापुर औद्योगिक वसाहतीत एका रासायनिकप्रक्रिया उद्योगामध्ये रविवारी सकाळी अपघात होऊन वायु गळती झाली आहे.वायूची बाधा होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला आहे,मयत कामगाराच्या वाचवण्यासाठी गेलेले चार कामगार जखमी झाल्याची समोर येत आहे.

भागवत चौपाल (वय २२) असे मयत कामगाराचे नाव आहे.रविवारी सकाळी कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अपघात झाल्याने वायू गळती झाली होती. यात वायूची लागन झाल्याने भागवत चौपाल याला उपचारासाठी बोईसरच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेलं चार कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com