esakal | मुरुडच्या किनाऱ्यावर डॉल्फिन, युवकाची मन जिंकून घेणारी कृती
sakal

बोलून बातमी शोधा

मुरुडच्या किनाऱ्यावर डॉल्फिन, युवकाची मन जिंकून घेणारी कृती

मुरुडच्या किनाऱ्यावर डॉल्फिन, युवकाची मन जिंकून घेणारी कृती

sakal_logo
By
मेघराज जाधव

मुरूड: 'तौत्के' चक्रीवादळामुळे (tauktae cyclone) मागच्या दोन दिवसांपासून समुद्र खवळला आहे. रायगड किनारपट्टीवर (Raigad coast) सलग तीन दिवसांपासून घोंगावणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० असा आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून समुद्राने पोटातून अनेक गोष्टी बाहेर फेकल्या आहेत. (tauktae cyclone dolphins at murud coast)

परिणामी लाटांसोबत डॉल्फिन सारखे मोठे मासेही किनाऱ्यावर (dolphins at murud coast) आले होते. आज सकाळी मुरुड समुद्र किनारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ऋषिकेश बैलेचा या युवकाच्या नजरेला दोन डॉल्फिन मासे पडले. डॉल्फिन मासे हे खोल समुद्रात आढळतात. अपवादानेच ते किनाऱ्याजवळ दिसतात.

हेही वाचा: IIT मुंबईची पोरं हुशार!! मोठा प्रयोग केला यशस्वी

मुरुडच्या नबाब पॅलेस खालील समुद्र किनाऱ्यावर चक्क पाच फूट लांबीचा अंदाजे ४० किलो वजनाचा डॉल्फिन मासा दृष्टीस पडला. त्याने आपला भाऊ रुचित याला बोलावून घेतले व हे देखणे डॉल्फिन पुन्हा परिश्रमपूर्वक खोल समुद्रात सुखरूपपणे सोडून दिले. यातला एक मासा किनाऱ्याच्या दिशेने वारंवार येत असल्याने त्याला पुन्हा खोल समुद्रात सोडण्यासाठी चांगलीच दमछाक झाली.