दोन वर्षापासून रखडलेल्या 'TET' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

TET exam
TET examsakal media
Updated on

मुंबई : मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET exam) अखेर वेळापत्रक (timetable) जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा राज्यात 10 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. यामुळे राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षक (teacher) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावी शिक्षकांना (future dream) या परीक्षेच्या तब्बल दोन महिन्याहून अधिकचा वेळ मिळणार आहे. (teacher TET timetable announced finally

राज्यभरात टीईटीची परीक्षा ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात येणार असून त्यासाठी 3 ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, अनुदानित आदी शाळांमध्ये लवकरच 6 हजार 100 नवीन शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भावी शिक्षकांना ही परीक्षा देणे अनिवार्य आहे. राज्यात 2019 नंतर टीईटीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही परीक्षा आयोजित करून नवीन तरुण उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती.

TET exam
मुंबईत कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी फक्त 1 टक्के रुग्ण गंभीर

असे आहे टीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक

1. ऑनलाइन अर्जासाठी मुदत : 3 ते 25 ऑगस्ट

2. प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध : 25 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर

3. टीईटी पेपर 1 : 10 ऑक्‍टोबर, सकाळी 10.30 ते दुपारी 1

4. टीईटी पेपर 2 : 10 ऑक्‍टोबर, दुपारी 2 ते 4.30

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com